Breaking

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दहा वर्षांपासून अत्याचार ; मुलाला दिला जन्म

Updated: ऑक्टोबर 16, 2025

By Vivek Sindhu

कोल्हेवाडीत भांडण ; आठ जणांवर गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

तरुणाविरुद्ध बलात्कार, पोक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

केज – एका आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर मागील दहा वर्षापासून बलात्कार केला. या पीडितेने मुलाला जन्म दिला असून तरुणाच्या घरी राहणाऱ्या पीडितेला बाळासह संबंधित तरुणाच्या आई वडिलांसह भावाने हाकलून दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. याप्रकरणी तरुणाविरुद्ध बलात्कार, पोक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील सवर्ण समाजाच्या संभाजी दत्तू ढगे या तरुणाने एका आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीवर मागील दहा वर्षापूर्वी बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही घटना पीडित मुलीच्या आई-वडिलांना माहीत झाल्याने ती तरूणी सज्ञान झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात त्यांच्या जातीच्या तरुणासोबत तिचे लग्न लावून दिले. मात्र लग्नानंतर ही संभाजी ढगे हा तिच्या घरी जाऊन तिच्या नवऱ्याला मारहाण करीत बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला धमक्या देत होता. यातून ती तरूणी गरोदर राहिली. ही माहिती तिच्या नवऱ्याला व सासरच्या लोकांना माहीत झाल्यानंतर तिला तिच्या माहेरी आणून सोडले.

सात महिन्याची गरोदर असलेली ती अत्याचारित तरुणी माहेरी आल्यानंतर संभाजीच्या घरी राहून तिने लग्नाचा हट्ट धरला. तू सात महिन्याची गरोदर असल्याने लग्न करता येणार नाही. असे म्हणत त्याने टाळाटाळ केली. त्यानंतर तिने मुलाला जन्म दिला. त्या लहान मुलाचा देखील तरुणांच्या घरच्यांनी काही काळ सांभाळ केला. त्या तरुणाच्या घरच्या लोकांनी त्याला गोड बोलून एकट्याला काम धंद्यासाठी बाहेरगावी पाठवून दिले. त्या आदिवासी तरुणीला तिच्या लहान बाळासह घरी ठेवून घेतले. काही दिवसानंतर तरुणाच्या आई – वडीलांनी भावाने त्या आदिवासी तरुणीला तू हलक्या जातीची आहेस, म्हणत तिला लहान बाळासह घराबाहेर हाकलून दिले. तिने पोलिस ठाणे गाठून १५ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून संभाजी दत्तू ढगे याच्याविरुद्ध बलात्कार, पोक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम हे करीत आहेत.

पीडितेच्या पतीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

त्या पीडितेच्या पतीला संभाजी ढगे याने तिच्या सासरी जाऊन मारहाण करीत तिच्यावर बळजबरी करीत असल्याने तिच्या पतीने या प्रकाराला वैतागून त्या तरुणीच्या माहेरी जाऊन विषारी औषध प्राशन करीत दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

एसपीकडे मांडली कैफियत

पीडित तरुणीने जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत हे केज येथे तपासणीसाठी आले असता त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या अत्याचाराची कहाणी त्यांच्या कानावर घातली होती. आता नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम हे गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी आपला दरारा निर्माण करणार का ? याकडे लक्ष लागले आहे.


Categories

Recent Posts