Breaking

निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिसांना सज्ज राहण्याचे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे निर्देश

Updated: ऑक्टोबर 30, 2025

By Vivek Sindhu

निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिसांना सज्ज राहण्याचे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे निर्देश

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी गुरुवारी बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रण यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या बैठकीस बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि चेतना तिडके उपस्थित होते.

मिश्र यांनी जिल्ह्यातील पोलीस दलाला निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये, यासाठी कडक आणि थेट निर्देश दिले. मागील निवडणुकीत गुन्हे दाखल असलेल्या घटकांवर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. शरीराविरुद्धचे गुन्हे, घरफोड्या, चोरीसारख्या गुन्ह्यांचे तातडीने उकल करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

या बैठकीत अवैध धंदे, मटका, दारूबंदी उल्लंघन यांसारख्या गैरप्रकारांवर विशेष लक्ष देण्याचे आणि कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या प्रलंबित तपास प्रकरणांना गती देण्याचे आदेशही त्यांनी दिले. फरार आरोपींचा शोध, हरवलेल्या मुलांच्या तक्रारींची तातडीने दखल आणि जप्त मुद्देमाल फिर्यादीला परत देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यावरही त्यांनी भर दिला. तपासात ई-साक्ष ॲपचा प्रभावी वापर करावा, असेही त्यांनी नमूद केले.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव
बैठकीदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीड शहर, पिंपळनेर, परळी शहर, अंबाजोगाई ग्रामीण, नेकनूर यांसह सुमारे १५ ते २० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

उपनिरीक्षक वजूरकर यांचा गौरव
पोलीस अधीक्षक वाचक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक वजूरकर 31 ऑक्टोबर रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवेतल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.


Categories

Recent Posts