Breaking

विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

Updated: सप्टेंबर 29, 2025

By Vivek Sindhu

विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. २८) सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली.
अतिवृष्टीने सर्वत्र पाणी झाले असून जिवाचीवाडी येथील शेतकरी श्रीराम प्रल्हाद चौरे यांच्या घरात पावसाच्या पाण्यामुळे ओलावा निर्माण झाला होता. विजेचा प्रवाह उतरल्याने श्रीराम चौरे यांना जोराचा विजेचा शॉक बसला. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार अशोक सोनवणे, पोलीस नाईक पुरुषोत्तम शेप यांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविला. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले असून या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Categories

Recent Posts