केज – केज तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी ५.३० ते ६ वाजेच्या दरम्यान झालेल्या पावसात कुंबेफळ येथे वीज अंगावर पडल्याने गाय ठार झाली. तर पवारवाडीत ही घरावर वीज पडल्याने घराचे थोडे नुकसान झाले.
कुंबेफळ येथील शेतकरी शिवाजी गणपती थोरात हे शेतात गायी चारीत असताना शुक्रवारी सायंकाळी ५.३० ते ६ वाजेच्या दरम्यान आल्याने गायी कोठ्याकडे जात असताना एका गायीच्या अंगावर वीज कोसळल्याने गायीचा जागीच मृत्यू झाला. तर शेतकरी शिवाजी थोरात हे सुदैवाने बचावले. तर तालुक्यातील पवारवाडी येथील भागवत पवार यांच्या घरावर ही वीज पडली आहे. त्यात भिंतीचे नुकसान झाले असून सुदैवाने घरात असलेल्या कुटुंबातील कोणालाही इजा झाली नाही.