Breaking

वाण नदीत वाहून गेलेला अनिल लोखंडे याचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला

Updated: ऑगस्ट 30, 2025

By Vivek Sindhu

वाण नदीत वाहून गेलेला अनिल लोखंडे याचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

धारूर : तालुक्यातील आवरगाव येथील वाण नदीवरून २७ ऑगस्ट रोजी वाहनासह वाहून गेलेल्या अनिल बाबुराव लोखंडे (रा. धारूर) याचा मृतदेह अखेर तीन दिवसांच्या शोधानंतर सापडला.

छत्रपती संभाजीनगर येथील विशेष बचाव व सुरक्षा पथक आणि धारूर नगरपरिषद अग्निशामक दलाच्या जवानांनी सतत शोधमोहीम राबवून शनिवारी (दि.३०) सकाळी घटनास्थळापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर नदीपात्रातील झाडीमध्ये अडकलेल्या अवस्थेत मृतदेह शोधून काढला.

२७ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजनडोह व आवरगाव येथे नदीपात्रातून दोन जण वाहनासह वाहून गेले होते. त्यापैकी एकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळीच सापडला होता. मात्र लोखंडे यांचा मृतदेह सापडत नसल्याने महसूल, पोलीस व बचाव पथकाने दोन दिवस प्रयत्न केले.

मृतदेहाची अवस्था विद्रूप झाली असून पाण्यातील माशांनी त्याचे शरीर खाल्ल्यामुळे तो ओळखता न येण्याजोगा दिसत होता. बचाव पथक व प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनंतर हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

धारूर परिसरातील मुसळधार पावसामुळे झालेल्या या दुर्घटनेने हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांनी अशा काळात नदी-नाल्यांजवळ खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Categories

Recent Posts