Breaking

वडवणी बसस्टँडवर सोन्याचे गंठण चोरीला

Updated: ऑक्टोबर 31, 2025

By Vivek Sindhu

वडवणी बसस्टँडवर सोन्याचे गंठण चोरीला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

वडवणी : वडवणी बसस्टँडवर प्रवासासाठी बसमध्ये चढत असताना एका महिलेकडून सोन्याचे गंठण असलेली पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. या प्रकरणी आधीमाया दत्ता बडे (वय २९, व्यवसाय घरकाम, रा. खामगाव, ता. परळी, जि. बीड) यांनी वडवणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता बीड–परळी महामार्गावरील वडवणी बसस्टँड येथे घडली. आधीमाया बडे या दिवाळी साजरी करून मामा विकास बडे यांच्या घरीहून माहेर खामगावला जात होत्या. बसमध्ये चढताना त्यांच्या बॅगेतील सोन्याचे गंठण असलेली छोटी पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

गेला माल म्हणून दोन तोळे अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे पट्टी गंठण, किंमत अंदाजे ८१,२५० रुपये असा ऐवज चोरीला गेला आहे.

या प्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस हवालदार जावळे करीत आहेत.


Categories

Recent Posts