Breaking

बीड जिल्हा कारागृहातील कथित ‘धर्मांतरण’ प्रकरण भोवले

Updated: ऑक्टोबर 15, 2025

By Vivek Sindhu

बीड जिल्हा कारागृहातील कथित 'धर्मांतरण' प्रकरण भोवले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

वादग्रस्त अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची अखेर उचलबांगडी

बीड – बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांच्या सक्तीने धर्मांतरण करण्याच्या प्रयत्नांच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेले कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. गायकवाड यांना कारागृह अधीक्षक पदावरून उपाधीक्षक म्हणून नागपूरला पाठविण्यात आले आहे.

बीड कारागृहात रुजू झाल्यापासून पेट्रस गायकवाड अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरले होते. कारागृहातील झाडे तोडणे आणि कैद्यांकडून खासगी कामे करून घेणे, अशा आरोपांसोबतच त्यांच्यावर कैद्यांचे सक्तीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्याचा सर्वात गंभीर आरोप होता.

आमदार पडळकरांकडून थेट आरोप

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी बीडच्या कारागृह अधीक्षकांवर थेट आरोप करत हे प्रकरण चव्हाट्यावर आणले होते. बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचे काम होते.कारागृहातील सगळ्या महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलमधील श्लोक लिहिले आहेत.छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपतीची मूर्ती, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे फोटो एका खोलीत टाकलेले आहेत.कैदी जे भजन, कीर्तन करायचे ते पूर्णपणे बंद करून टाकले आहे.त्या अधिकाऱ्याला भेटायला एक पादरी भेटायला येतो. ‘धर्मांतर करा, लाखो रुपये देतो’ अशा प्रकारची भूमिका तुरुंग अधिकारी घेत आहेत.पडळकर यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून तुरुंग अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची मागणी केली होती.

कैद्यांकडून ही शारीरिक-मानसिक छळाचा आरोप

आमदार पडळकर यांच्या आरोपांनंतर या प्रकरणात आणखी भर पडली. कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनीही बीडच्या कारागृहात कैद्यांना धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणला जातो आणि त्यासाठी त्यांचा मानसिक तसेच शारीरिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. इतकेच नव्हे, तर बीडच्या कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका कैद्याने ही अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर धर्मांतराचे आरोप केले होते. यामुळे बीडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. अखेर, या गंभीर आरोपांची दखल घेत शासनाने गायकवाड यांची उचलबांगडी केली आहे.

बीड कारागृहात धर्मांतरासाठी ‎मारहाण

बीड कारागृहातून जामिनावर बाहेर ‎आलेल्या एका कैद्याने शुक्रवारी‎ आरोप केला की, पेट्रस गायकवाड‎ यांनी त्याला व इतर कैद्यांना धर्मांतर ‎‎करण्यासाठी मारहाण केली. पैशांचे ‎‎आमिष दाखवले. गुन्ह्यातून मुक्त ‎‎करण्याचे आश्वासन दिले.‎ कारागृहातील कीर्तन, भजन, नमाज‎ या प्रार्थना बंद केल्या गेल्या आहेत, ‎‎असाही आरोप केला. यापूर्वी‎ जळगावात अधीक्षक असताना एका ‎‎कैद्याचा मृत्यू झाला होता. त्या‎ कैद्याच्या पत्नीनेही आरोप केला की, ‎‎धर्मांतरासाठीच मारहाण केल्याने‎ पतीचा मृत्यू झाला. पेट्रस गायकवाड‎ हे केस मागे घेण्यासाठी आमिष‎ दाखवत आहेत असा आरोप केला.‎ वाचा सविस्तर

गोपीचंद पडळकरांचा कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता बीडचे कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप केले आहेत. बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचे काम होते, सगळ्या महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलमधील श्लोक लिहिल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. तसेच जेलमधील कीर्तन बंद करण्यात आले असून कैद्यांना धर्मांतरासाठी लाखो रुपयाचे आमिष दाखवले जात असल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली असून या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.


Categories

Recent Posts