Breaking
Updated: फेब्रुवारी 24, 2026
कापणी करून ठेवलेल्या राजम्याच्या गंजीला अज्ञातांनी आग लावली
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- मळणी करण्यासाठी कापणी करून ठेवलेल्या राजमा पिकाच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटविल्याने शेतकऱ्याचे सुमारे ५६ हजार रु. चे नुकसान झाले आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील सारूकवाडी येथील शेतकरी
उत्तम बाबुराव सारुक याने त्याच्या शेतातील राजमा पिकाची कापणी करून मळणी करण्यासाठी गंज लावून ठेवली होती. दि. २२ फेब्रुवारी रोजी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने त्यांनी कापणी केलेले राजमा ची गंज झाकून ठेवली होती. त्या नंतर दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ते शेतात गेले असता कोणी तरी अज्ञातांनी त्यांच्या राजम्याच्या पिकाच्या गंजीला आग लावून नुकसान केल्याचे आढळून आले. यात त्यांचे सुमारे ५६ हजार रु. चे नुकसान झाले आहे.
उत्तम सारूक यांच्या तक्रारी वरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ८४/२०२६ भा. न्या. सं. ३२६ (एफ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस जमादार तुकाराम मुरकुटे हे तपास करीत आहेत.