Breaking

अंबाजोगाईतील दोन मटका चालकांची एमपीडीएअंतर्गत हर्सूल कारागृहात रवानगी

Updated: ऑक्टोबर 29, 2025

By Vivek Sindhu

InShot 20251029 151126582 scaled

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचा अवैध जुगार चालकांना दणका

बीड : जिल्ह्यातील गुन्हेगारी, अवैध मटका जुगार व गुंडगिरीवर आळा घालण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत अंबाजोगाई शहरातील दोन कुख्यात मटका चालकांविरोधात एमपीडीए (Maharashtra Prevention of Dangerous Activities Act) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशानुसार अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद जोगदंड यांनी सय्यद अन्वर सय्यद अजगर (वय ४१, रा. खतीब गल्ली, अंबाजोगाई) आणि चाँद इमाम गवळी (वय ४४, रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) या दोघांविरोधात एमपीडीएअंतर्गत प्रस्ताव तयार करून जिल्हादंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे सादर केला होता. तपासानंतर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी आदेश जारी करत दोन्ही आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याचे निर्देश दिले.

पोलीसांच्या गुप्त माहितीवरून दोन्ही आरोपींना २८ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले आणि २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.४५ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

या दोन्ही आरोपींविरुद्ध अंबाजोगाई शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात मटका जुगार खेळवणे, धमक्या देणे, शिवीगाळ करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे सहा प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दोघांवर कलम ११० सीआरपीसी अंतर्गत पूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई झाली होती, मात्र त्यांचे वर्तन न सुधरल्याने ही कठोर पावले उचलण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (भापोसे), अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड व शरद जोगदंड यांनी संयुक्तरीत्या केली. अंमलबजावणीत स्थागुशा बीडचे पथक सहभागी होते.

पोलीस अधीक्षक काँवत यांनी सांगितले की, भविष्यात अवैध जुगार, गुटका विक्री, वाळू माफिया, काळाबाजार करणारे तसेच सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात MPDA व MCOCA कायद्याअंतर्गत कठोर कारवाई सुरूच राहील.


Categories

Recent Posts