Breaking
Updated: एप्रिल 4, 2026
शेतकऱ्याची ३५ हजारांची इलेक्ट्रिक केबल आणि स्टार्टर चोरीला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- केज तालुक्यातील नांदूर घाट ता. केज येथील तळ्याच्या आई देवीच्या यात्रेत मंदिर परिसरात सोरट नावाचा जुगार खेळवीत असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्यांच्या कडून सोरट या जुगार चित्राचा चार्ट व नगदी सहा हजार ३५० रुपये जप्त केले. नांदूरघाट ता. केज येथे तळ्याच्या आई देवीची यात्रा असून मंदिर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३ एप्रिल रोजी २ ते २.३० वा.च्या दरम्यान दोन ठिकाणी छापे मारून आकाश बापू शिंदे व शिवा दादा शिंदे या दोघांना विविध चित्रावर पैसे लावून स्वतःच्या फायद्यासाठी सोरट नावाचा जुगार खेळवित असताना रंगेहाथ पकडले. या दोघां कडील सोरट जुगार चित्राचा चार्ट व नगदी ६ हजार ३५० रुपये जप्त केले. जमादार दिलीप गित्ते व जमादार महेश जोगदंड यांच्या फिर्यादी वरून आकाश शिंदे व शिवा शिंदे या दोघां विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.