Breaking

अठ्ठावीस वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा झटका

Updated: मार्च 2, 2026

By Vivek Sindhu

अठ्ठावीस वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा झटका.....!

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – केकेज तालुक्यातील साळेगाव येथील रहिवासी तथा तंत्रस्नेही तरुणाचे अवघ्या २८ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अकाली निधन झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

 गौरवकुमार अरुण झाडबुके वय (२८ वर्ष) हे  बी-टेकचे शिक्षण घेतलेला तरुण पुणे येथे त्याने एम पी एसी ची तयारी करून त्याने साळेगाव येथे सी एस सी सेंटर सुरू केले होते. तसेच ते साळेगाव ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री योजना दूत म्हणून सुद्धा कार्यरत होते. दि. २ मार्नांच रोजी ते सकाळी ८:३० वाजता घरच्या बाहेर जात असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्या नंतर त्यांना केज येथे उपचारासाठी घेऊन गेले असता त्यांना मृत घोषित केले. गौरवकुमार झाडबुकडे हे अत्यंत मनमिळावू, मितभाषी आणि सर्वांशी प्रेमाने वागणारा तरुण होता. ऐन होळीच्या दिवशी त्यांचे निधन झाल्याने गावात अनेकांनी होळीचा सण साजरा केला नाही. गौरवकुमार झाडबुके यांच्या अकाली निधनाने गावात आणि सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सोमवारी दुपारी ४:३० वा. त्यांच्या शेतात अंत्यविधी करण्यात आले यावेळी अनेकजण मान्यवर उपस्थित होते.

त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ व बहीण असा परिवार आहे. 


Categories

Recent Posts