Breaking

शेतातील पत्र्याच्या शेड वरून भांडण : चौघा विरुद्ध गुन्हा दाखल

Updated: मार्च 2, 2026

By Vivek Sindhu

विवाहित महिलेचा छुपा पाठलाग करणाऱ्या विरुद्ध ॲट्रॉसिटीसह विनयभंगाच्या गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज :- पत्र्याच्या शेडचे अँगल दुसऱ्याच्या जागेत उभे करण्या वरून केज तालुक्यातील जाधव जवळा येथे भांडण झाले असून चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक २८ फेब्रुवारी रोजी रात्री ८:०० वा. च्या सुमारास अशोक नवनाथ जाधव यांच्या जागेत त्यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने पत्र्याचे शेड उभे करण्यासाठी लोखंडी अँगल उभे केले होते. त्या बाबत अशोक जाधव यांनी त्यांना जाब विचारला आणि उभे केलेले अँगल काढून घ्या; असे म्हणताच “आम्ही अँगल काढणार नाही. तुला काय करायचे ते कर.”  असे म्हणून अशोक जाधव यांना कीर्ती शरद शिंदे, मगन नामदेव जाधव, विकास मगन जाधव, बाळासाहेब व्यंकट जाधव यांनी मारहाण केली. तर विकास जाधव याने काठीने डोक्यात डावे बाजुला, पाठीवर मारुन मुका मार दिला. बाळासाहेब जाधव हा अशोक जाधव यांना म्हणाला की, “तु जर जास्त शहाणपणा केलास तर तुला जिवंत सोडणार नाही.”  अशी धमकी दिली.

अशोक जाधव यांच्या तक्रारी वरून कीर्ती शरद शिंदे, मगन नामदेव जाधव, विकास मगन जाधव, बाळासाहेब व्यंकट जाधव या चौघा विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. न. ९५/२०२६ भा. न्या. सं. ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास पोलिस हवालदार सानप हे करीत आहेत.


Categories

Recent Posts