Breaking
WhatsApp Group
Join Nowकेज – केज – मांजरसुंबा रस्त्यावरील टोलनाक्याजवळ चालत्या ट्रकवर चढून अज्ञात चोरट्यांनी २६ हजार पाचशे रुपयांचे शेंगदाण्याचे ५ कट्टे लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
राजस्थान राज्यातील बिरामसर (ता. नौका जि. बिकानेर) येथील ट्रक चालक – मालक छगनलाल मोहनलाल चौधरी हे बिकानेर येथून ४०० शेंगदाणा कट्टे ट्रकमध्ये (आर. जे. ०७ जी. बी. ३८१७) भरून लातूरकडे निघाले होते. ३ जुलै रोजी सकाळी ७ वाजता मांजरसुब्याकडून केज मार्गे लातूरकडे जात असताना उमरी फाट्याजवळील टोलनाक्याजवळ अज्ञात चोरट्यांनी चालत्या ट्रकवर चढून ताडपत्री फाडून ट्रकमधील २६ हजार पाचशे रुपयांचे शेंगदाण्याचे ५ कट्टे लंपास केले. ट्रक चालक छगनलाल चौधरी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार फुलचंद सानप हे करीत आहेत.
Last Updated: July 5, 2025