Breaking

टोलनाक्यावर दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या चौघांवर गुन्हा

Updated: ऑक्टोबर 4, 2025

By Vivek Sindhu

एएसपी चेतना तिडके यांच्या निदर्शनास आला प्रकार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

एएसपी चेतना तिडके यांच्या निदर्शनास आला प्रकार

केज – अंबाजोगाई येथील चौघे हे दारूच्या नशेत राष्ट्रीय महामार्गावर उमरी फाट्याजवळील टोलनाक्यावर गडबड गोंधळ करीत असल्याचा प्रकार तेथून चाललेल्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ केज पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्यानंतर पोलिसांनी जाऊन त्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.

केज – मांजरसुंबा रस्त्यावरील उमरी फाट्याजवळ असलेल्या टोलनाक्यावर कार चालक पंकज पपु गिरी (रा. पाण्याची टाकी, मोरेवाडी, अंबाजोगाई ) व त्याचे मित्र शिवराज सदाशिव थोरात (रा. रुईधारुर ता.धारुर), धोंडीराम बाबुराव लोखंडे (रा. संतकबीर नगर, अंबाजोगाई), निखील महादेव पाडुळे (रा. रमाई चौक, अंबाजोगाई) हे चौघे दारूच्या नशेत १ ऑक्टोबर रोजी रात्री ७.१५ वाजेच्या दरम्यान कारने (एम. एच. ४४ एई ३३६७) येऊन गडबड गोंधळ करीत होते.

याचवेळी येथून जात असलेल्या अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्याशी संपर्क साधून संबंधित तळीरामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उनवणे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, जमादार बाळासाहेब अहंकारे, पोलीस कर्मचारी सिद्धीक शहा यांना तात्काळ घटनास्थळी पाठवून या मद्यपी चौघांना ताब्यात घेतले.

त्या चौघांची ब्रेथ अनालायझर मशीनद्वारे तपासणी केली असता त्यांनी अल्कोहोलचे (दारूचे) सेवन केल्याने स्पष्ट झाले. पोलीस कॉन्स्टेबल सिद्धीक शहा यांच्या फिर्यादीवरून पंकज गिरी, शिवराज थोरात, धोंडीराम लोखंडे, निखिल पाडुळे या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


Categories

Recent Posts