Breaking
Updated: एप्रिल 10, 2026
तिघांनी केली शेजाऱ्याला मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: शेतीच्या सामाईक बांधाच्या कारणावरून झालेल्या वादात तिघांनी मिळून एका शेतकऱ्याला डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना शिंदेवाडी शिवारात घडली आहे.
याप्रकरणी भारत कुंडलिक शिंदे (वय ४०, रा. शिंदेवाडी) यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भारत शिंदे आणि आरोपींची शेती शेजारी आहे. शेतीच्या बांधावरून आरोपी मंजाभाऊ आप्पाराव शेळके, विष्णू लक्ष्मण शेळके आणि उत्तम आप्पाराव शेळके यांनी भारत शिंदे यांना शिवीगाळ केली. वादादरम्यान आरोपींनी भारत यांच्या डोक्यात दगड मारला आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शिंदे जखमी झाले आहेत. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार घोळवे तपास करत आहेत.