Breaking
Updated: सप्टेंबर 16, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelधारूर : केज रोड, धारूर येथे अनोळखी तीन चोरट्यांनी एटीएम मशीन तोडून २६,२०० रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार दि. १४ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३९ ते ४.४८ या वेळेत घडला.
फिर्यादी भिकाजी संभाजी लिमकर (वय ४४, व्य. खाजगी नोकरी, रा. उंचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांनी एटीएम मशीनमध्ये प्रवेश करून तोडफोड केली व एकूण २६,२०० रुपये (५०० रुपयांच्या ५२ नोटा व १०० रुपयांच्या २ नोटा) रोख रक्कम चोरी करून नेली.
या प्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोह गवळी करत आहेत.