Breaking

शेती आणि वारकरी संस्कृती संवर्धन करणारा कीर्तन महोत्सव – पत्रकार विलास बडे

Updated: मार्च 2, 2026

By Vivek Sindhu

हक्कासाठी लढण्याची शिकवण संतांची देण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

हक्कासाठी लढण्याची शिकवण संतांची देण

सिरसाळा – ज्या प्रमाणे वारकऱ्यांना विठ्ठलाच्या भक्तीची आस असते त्याच प्रमाणे शेतकऱ्यांला त्याच्या कष्टाची पीक येईल की नाही? शेतमालाला भाव मिळेल का नाही हे देखील माहिती नसताना देखील शेतीची आस असणारी भक्ती असते यामुळे शेतकरी आणि वारकरी हे वेगळे नसून एकच आहेत. या उद्देशाने शेतकरी आणि वारकरी यांचे जतन, संवर्धन करणारा हा कीर्तन महोत्सव असून शेतकऱ्यांनी बोलण्याचे, अन्याया विरोधात आवाज उठवायची शिकवण हे संतांच्या विचाराने दिलेली असल्याने एकजुटीने हक्कासाठी लढले पाहिजे असे प्रतिपादन पत्रकार विलास बडे यांनी केले. गाव समूहाच्या शेतकरी कीर्तन महोत्सवात शेती, माती आणि माणूस परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी ते प्रमुख वक्ते म्हणून तर कीर्तनकार हभप अविनाश महाजन भरती, सह्याद्री देवराई प्रकल्पाचे किशोर चाटे, सुशील गोटे हे संत विचार मंथन मंचावर उपस्थित होते. 

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नावर आपल्या सडेतोड लेखणीतून, बडे मुद्दे सारख्या मंचावरून प्रसार माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथा चव्हाट्यावर आणणारे पत्रकार विलास बडे पुढे बोलताना म्हणाले की, समाजात जाती-धर्माच्या भित्तीने समाज दुभंगाला असताना देखील “मढे झाकोनिया करिती पेरणी । कुणबियाचे वाणी लवलाहो ही ।। “

या संत तुकोबारायांच्या अभांगानुसार शेतकरी ही एकच जात आहे मात्र धोरणकर्त्ते शेतकऱ्यांना त्यांच्या मूलभूत प्रश्नापासून दूर ठेवण्यासाठी जाती-धर्मात द्वेष निर्माण करण्याचे धोरणात्मक काम जोमाने करत आहेत. 12 व्या शतकापासून अनेक संतांनी सर्वधर्म समभावाची रुजवन करण्यासाठी देह झिजविले, महाराष्ट्राची खरी संस्कृती शेतकरी आणि वारकरी असताना शेतकऱ्यांना शिक्षण, आरोग्य, विकास, शेतकऱ्यांच्या पोरांना रोजगार, शेती मालाला हमीभाव या मूलभूत प्रश्नापासून दूर करत जाती-धर्माची, संत आणि त्याचे विचार जाती-जातीत दुभंगून गावगाडा संपवून माणूस दुभंगल्याने शेतकऱ्यांची अवस्था पोतराजा सारखी होऊन अस्मानी आणि सुलतानी फटके पाठीवर सहन करावे लागत आहेत. या ही परिस्थितीत शेतकऱ्यांची पोर आपल्या क्रयशक्तीचा वापर हा राजकीय स्वार्थापोटी करणाऱ्या शक्ती ओळखून आपल्या जन्मदात्या माता-पित्याचा उद्धाराकरिता करण्यासाठी संतांचे विचार उपयुक्त असून या शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना शेतकरी पुत्रांना जीवन जगण्याची उभारी देत आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला भाव, पाणी आणि निसर्गाची अवकृपा यांच्याशी कायम संघर्ष करावा लागत असून जाती-धर्माचे भुरसटलेले विचार सोडून एकजुटीने हक्कासाठी लढायला शिकले पाहिजे, शेतकऱ्यांनी आपल्या एकजुटीची ताकद ओळखून आपला हक्क मिळवण्यासाठी लढले पाहिजे, तरुण शेतकऱ्यांनी शेतीसोबतच जोड व्यवसाय, प्रक्रिया उद्योगाकडे वळले पाहिजे असे सांगितले. 

या दुसऱ्या दिवशीच्या संत विचार मंथनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऑड.अजय बुरांडे यांनी करत स्वतः शेती करत वारकरी संस्कृती जपत पहिले कर्जमाफी देणारे जगतगुरु तुकोबाराया यांचा बीजेनिमित होणारे हे शेतकरी कीर्तन महोत्सव हा केवळ सोहळा नसून कृतिशील काम करणारे, शेती आणि संत विचार समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न करणारे एक माध्यम असल्याचे सांगितले. या प्रसंगी हभप श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी शेतकऱ्यांची एकजुट काय करून दाखवतो शकते हे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध आंदोलनाला मिळालेल्या यशाचे दाखले देत विषद केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विशाल देशमुख तर ऋणव्यक्त सुभाष सोळंके यांनी केले. संत विचार मंथनानंतर हभप अविनाश महाराज भारती यांचे कीर्तन संपन्न झाले.


Categories

Recent Posts