Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

सुनेत्रा पवार स्वीकारणार उपमुख्यमंत्रिपद; शनिवारी सायंकाळी पाच वाजता होणार शपथविधी

Updated: जानेवारी 30, 2026

By Vivek Sindhu

शनिवारी सायंकाळी पाच वाजता होणार शपथविधी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची धुरा आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सांभाळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची शनिवारी दुपारी होणाऱ्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी अधिकृत निवड केली जाईल, त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता त्यांचा राजभवनात शपथविधी पार पडणार आहे. अजित पवारांच्या निधनामुळे पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पक्षांतर्गत चर्चा आणि महत्त्वाचे निर्णय

अजित पवारांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या पाच वरिष्ठ नेत्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची चर्चा झाली. ‘डिझाईन बॉक्स’चे प्रमुख नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चर्चा केली, त्यानंतर त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आहे. या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली असून, प्रशासकीय पातळीवर शपथविधीची तयारी सुरू झाली आहे.

अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीचा आग्रह

अजित पवार यांच्याकडे अर्थ, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती होती. ही खाती राष्ट्रवादीकडेच राहावीत, असा पक्षाचा ठाम प्रयत्न आहे. विशेषतः अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीलाच मिळावे यासाठी वरिष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात ४५ मिनिटांहून अधिक काळ खलबतं झाली आहेत. पक्षप्रमुख म्हणूनही सुनेत्रा पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले असून, भाजप नेतृत्वानेही पवार कुटुंबातील व्यक्तीकडेच नेतृत्व असावे, असे मत व्यक्त केले होते.


Categories

Recent Posts