Breaking
Updated: मार्च 20, 2026
विवादित महिला आयोगाच्या अध्यक्षाप्रश्नी सत्ताधारी मुकगिळून गप्प
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड – महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य असल्याचा वलग्ना करणारे सत्ताधारी हेच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम करत असल्याची शंका नव्हे तर विश्वास सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. राज्य महिला आयोग महिलांचे शोषण रोखण्यासाठी की, लाडक्या बहिणींवर बलात्कार करणारांची पाठराखण करण्यासाठी?असा प्रश्न निर्माण झाला असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या भोंदू तांत्रिक बाबा खरात सोबतचे व्हिडीओ समाज माध्यमातून, वृत्तवाहिन्या मधून जनसामन्यात पसरत असताना धर्मांध सत्ताधारी मात्र या प्रश्नी मूकगिळून बघायची भुमीका घेत आहे.अंधश्रद्धेत लिप्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीबाई चाकणकर यांच्या तात्काळ राजीनामा घेऊन त्याची हकालपट्टी करावी यासाठी जनवादी महिला संघटना व बीड मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने शुक्रवार दि 20 रोजी धारूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली.
शिव शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात तथाकथित भोंदू तांत्रिक अशोक खरात याचे काळे कारणामे महाराष्ट्रासमोर उघड झाले आहेत. आणखी होत आहेत.विद्यमान काळात ही राजाश्रेयाने महिलांचे अश्लाघ्य शोषण सुरू असणे ही शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे. अघोरी कृत्य व महिलांचे शोषण करणारा हा भोंदू जरी गजाआड गेला असला तरी यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत असलेल्या मंडळींनी गंभीर दखल घेऊन अशा समाजद्रोही, स्त्रीविरोधी प्रवृत्तीला ठेचून काढून एक शिरस्ता कायम करावा. सोबतच राज्य महिला आयोगाच्या खुर्चीवर विराजमान असणाऱ्या रूपालीबाई चाकणकर या भोंदू बाबाच्या ट्रस्टच्या सदस्या तसेच पाठीराख्या असल्याचे समाज माध्यमांमधून समोर येत आहे. याची निश्पक्षपाती पद्धतीने चौकशी करून रुपाली चाकणकर याचा तात्काळ राजीनामा घ्यावा व निष्पक्षपाती चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी जनवादी महिला संघटना व बीड मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून शुक्रवार दि 20 रोजी धारूर तहसील समोर निदर्शने करण्यात आली. या प्रसंगी पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.ऑड. अजय बुरांडे यांच्यासह कॉ.अशोक थोरात, जनवादी महिला संघटनेच्या कॉ. मीराताई शिंदे, काशीराम सिरसाट, संजय चोले, कॉ.लता खोपकर, दादासाहेब सिरसाट, बालासाहेब चोले, धनविर तांबोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.