Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

वैद्यकीय क्षेत्रासाठी नेहमीच सहकार्याची भूमिका – नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा

Updated: फेब्रुवारी 2, 2026

By Vivek Sindhu

आयएमए शाखेचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे यांच्यासह नवीन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आयएमए शाखेचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे यांच्यासह नवीन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – येथील इंडियन मेडिकल असोसिएशन‌ योगेश्वरी शाखा, अंबाजोगाईचा रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. आयएमए योगेश्वरी शाखेच्या अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे यांच्यासह नवीन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला. यावेळी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशन‌चे राज्याध्यक्ष डॉ.संतोष कुलकर्णी यांनी आयएमएच्या माध्यमातून डॉक्टर समाजसेवा करीत आहेत असे सांगितले. तर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉक्टर बांधवांसाठी नेहमीच आमची कायमच सहकार्याची भूमिका राहिली आहे असे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी सांगितले.

शहरातील हॉटेल पियुष ईन, अंबाजोगाई या ठिकाणी रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन‌ योगेश्वरी शाखा, अंबाजोगाई यांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.संतोष कुलकर्णी (अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य.) तर सन्माननीय अतिथी म्हणून नंदकिशोर मुंदडा (नगराध्यक्ष, नगरपरिषद, अंबाजोगाई.), डॉ.शंकरराव धपाटे (अधिष्ठाता, स्वा.रा.ती. महाविद्यालय व रूग्णालय, अंबाजोगाई.), डॉ.रमेश भराटे (अध्यक्ष, स्थायी समिती, आयएमए, मुख्यालय.) आणि डॉ.राजेश इंगोले (अध्यक्ष, सांस्कृतिक समिती, आयएमए, महाराष्ट्र राज्य.) तर विशेष निमंत्रित म्हणून डॉ.सत्यप्रेम वारे (अध्यक्ष, आयएमए, कळंब.), डॉ.श्यामसुंदर काकानी (अध्यक्ष, आयएमए, माजलगाव.), डॉ.अजय नारायणकर हे मान्यवर उपस्थित होते. सदरील कार्यक्रमात प्रारंभी दीपप्रज्ज्वलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यांनंतर डॉ.उध्दव शिंदे यांनी स्वागतगीत सादर केले. सुरूवातीला मावळते अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे यांनी नुतन अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे यांना चार्टर देवून कार्यभार हस्तांतरित केला. त्यांनंतर डॉ.संतोष कुलकर्णी (अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य.) यांनी डॉ.राहुल धाकडे (अध्यक्ष) यांचे अभिनंदन करून कार्यभार सुपूर्द केला असल्याची अधिकृत घोषणा केली. आणि डॉ.उद्धव शिंदे (सचिव), डॉ.विजय लाड (उपाध्यक्ष), डॉ.बळीराम मुंडे (कोषाध्यक्ष), डॉ.अतुल शिंदे (सहसचिव), डॉ.निलेश तोष्णीवाल (सहसचिव), डॉ.नितीन पोतदार (सांस्कृतिक सचिव), डॉ.अनिल मस्के (सांस्कृतिक सचिव), डॉ.सुनील जाधव (सांस्कृतिक सचिव), डॉ.शिवराज पेस्टे (क्रीडा सचिव), डॉ.संदीप जोगदंड (क्रीडा सचिव), डॉ.विनोद जोशी (राज्य समन्वयक), डॉ.नवनाथ घुगे (माजी अध्यक्ष-आयपीपी) तसेच महिला शाखेच्या डॉ.मनीषा पवार (अध्यक्षा), डॉ.जिगिशा मारवाळे (सचिव) आणि डॉ.अरूणा केंद्रे (माजी अध्यक्षा महिला शाखा) या नवीन कार्यकारिणीला नियुक्तीपत्र व शपथ दिली. तर नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन‌ योगेश्वरी शाखा, अंबाजोगाईच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा निवडीबद्दल सत्कार केला. तर डॉ.राहुल धाकडे (अध्यक्ष) यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन‌ योगेश्वरी शाखा, अंबाजोगाईच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांचा ह्रद्य सत्कार केला. सुरूवातीला प्रास्ताविक करताना डॉ.नवनाथ घुगे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कार्याची, राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. नवीन कार्यकारणी ही असेच कार्य करेल असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर मनोगत व्यक्त करताना नुतन अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे यांनी सांगितले की, पदभार स्वीकारताना आनंद होत आहे. डॉ.नवनाथ घुगे यांच्याकडून डॉ.संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते व आपल्या साक्षीने हा पदभार स्वीकारला आहे. आगामी दोन वर्षांच्या कालावधीत आयएमएच्या माध्यमातून चांगले काम करू, पुढील सहा महिन्यांसाठी पुढील कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सदस्य यांना सोबत घेऊन आयएमए अंबाजोगाई शाखेचे नांव राज्यात सर्वदूर पोहोचविणार आहे. डॉ.नारायणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाईत एक दिवसीय परिषद आयोजित करण्याची घोषणा डॉ.धाकडे यांनी दिली. याप्रसंगी डॉ.रमेश भराटे, डॉ.राजेश इंगोले व अधिष्ठाता डॉ.शंकर धपाटे यांनी आपले समायोचित मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी डॉ.संतोष कुलकर्णी यांनी आयएमए शाखा अंबाजोगाईचे कौतुक केले. संघटना कशासाठी गरजेची आहे हे सांगितले, डॉक्टर व रूग्ण संवाद, कायदे, अर्थसंकल्पात आरोग्य विषयक तरतूद, मोफत रूग्णसेवा, गैरप्रकार रोखण्यासाठी काय करावे याबाबत मौलिक मार्गदर्शन राज्याध्यक्ष डॉ.कुलकर्णी यांनी केले. अध्यक्षीय समारोप करताना नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी ते वयाच्या १३ व्या वर्षांपासून व मागील ४७ वर्षे झाली स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाशी निगडित जनतेला सहाय्यभूत ठरेल असे काम करीत आहेत. असे सांगून त्यामुळे डॉक्टर बांधवांशी माझा सातत्यपूर्ण संपर्क आला आहे. संघटना आवश्यक आहे असे सांगून दिवंगत नेत्या डॉ.विमलताई मुंदडा व परिवाराच्या राजकीय जडणघडणीत डॉक्टर बांधवांचे देखील योगदान आहे. असे सांगून डॉ.राहूल धाकडे व आयएमएला आमदार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांचे व नगराध्यक्ष म्हणून माझे नेहमीच सहकार्य मिळेल अशी ग्वाही नगराध्यक्ष श्री.मुंदडा यांनी उपस्थित डॉक्टर बांधवांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मनीषा पवार व डॉ.जिगिशा मरवाळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ.उध्दव शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन‌ योगेश्वरी शाखा, अंबाजोगाईचे नुतन अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी व सदस्य यांनी पुढाकार घेतला होता. सदरील कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहरातील वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, विधी, शेती, शिक्षण, सहकार, साहित्य, पत्रकारीता, संगीत, कला, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Categories

Recent Posts