Breaking
Updated: फेब्रुवारी 24, 2026
बीडचा बहूमान; संसदीय मैत्री गटात खा.बजरंग सोनवणेंची निवड
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelभारत-उझबेकिस्तान मैत्री गटाची मोठी जबाबदारी
बीड: लोकसभा सचिवालयाच्या वतीने भारत-उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटाची १८व्या लोकसभेसाठी स्थापना करण्यात आली असून या गटात बीड जिल्ह्याचे खा.बजरंग मनोहर सोनवणे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खरे तर हा बीड जिल्ह्याचा बहूमान ठरणार आहे.
लोकसभा सचिवालयाच्या परिषद व प्रोटोकॉल शाखेकडून २३ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्राद्वारे ही माहिती देण्यात आली. लोकसभेचे अध्यक्ष यांच्या मान्यतेने खा.बजरंग सोनवणे यांची भारत-उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटाच्या सदस्यपदी नामनिर्देशित करण्यात आले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. भारत आणि उझबेकिस्तान या दोन्ही देशांमधील संसदीय सहकार्य वाढविणे, परस्पर संबंध अधिक दृढ करणे तसेच सांस्कृतिक, आर्थिक व राजनैतिक देवाणघेवाण मजबूत करणे या उद्देशाने संसदीय मैत्री गट कार्यरत असतात. या माध्यमातून दोन्ही देशांतील संसदीय प्रतिनिधींमध्ये संवाद आणि सहकार्य वाढण्यास मदत होते. खा.बजरंग सोनवणे यांची या महत्त्वपूर्ण गटावर निवड झाल्याने बीड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे. त्यांच्या निवडीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थानिक प्रश्न मांडण्याची तसेच देशाच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित विषयांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, भारत-उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटात सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल विविध स्तरांतून खासदार सोनवणे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.