Breaking
Updated: एप्रिल 9, 2026
स्वतःच्याच भाच्याचे दुकान पेट्रोल टाकून जाळले; केजमधील संतापजनक प्रकार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: स्वतःच्या सख्ख्या भाच्याच्या दुकानाला मध्यरात्री पेट्रोल टाकून आग लावल्याचा धक्कादायक प्रकार केज शहरात घडला आहे. या आगीत दुकानासह शेजारील दुकानांचेही मोठे नुकसान झाले असून सुमारे दीड लाख रुपयांची हानी झाली आहे.
या प्रकरणी भिम पिटू सासने (वय २२, रा. फुलेनगर, केज) या तरुणाने तक्रार दाखल केली आहे. भिम याचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय असून त्याचे केजमधील बीड रोडवर दुकान आहे. सात एप्रिल रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्याचा सख्खा मामा गोविंद किसनराव कोंबडे (रा. फुलेनगर, केज) याने दुकानावर पेट्रोल ओतून आग लावली. या आगीत भिमच्या दुकानातील मंडपाचे साहित्य, रोख रक्कम जळून खाक झाली. तसेच शेजारील रघुनाथ वारगजे यांच्या कृषी दुकानाचे आणि माऊली मेडिकलचेही मोठे नुकसान झाले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात मामा गोविंद कोंबडे हाच आग लावत असल्याचे निष्पन्न झाले.
या आगीत एकूण एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी भिम सासने याच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात मामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनसोडे करत आहेत.