Breaking
Updated: एप्रिल 9, 2026
जागेच्या वादातून शेजाऱ्यावर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: शेतातील गवत कापण्याच्या साध्या कारणावरून माजलगाव तालुक्यातील नागडगाव येथे एका ९५ वर्षीय वृद्ध आजोबांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीत वृद्ध गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
या मारहाणीबाबत स्वतः वसंतराव श्रीरंग नेगुळे (वय ९५, रा. नागडगाव, ता. माजलगाव) यांनी तक्रार दिली आहे. सहा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता वसंतराव हे गावातील गट क्रमांक ४५ मध्ये जनावरांसाठी गवत कापत होते. त्यावेळी आरोपी विनायक दादाराव नेगुळे आणि छबुबाई विनायक नेगुळे (दोघे रा. नागडगाव) यांनी तिथे येऊन हे गवत आमचे आहे, तुम्ही कापू नका असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. याच वादातून आरोपी विनायक याने वसंतराव यांच्या डोक्यात कोयत्याने मारून त्यांना जखमी केले, तर छबुबाई हिने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
या भयंकर घटनेनंतर वसंतराव यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बळवंते करत आहेत.