Breaking
Updated: जानेवारी 17, 2026
नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांची ग्वाही
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelनगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांची ग्वाही
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- शहरातील रविवार पेठ विभागातील लिंगायत समाजाच्या श्री शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठात तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत विविध प्रकारची विकास कामे करण्यात येतील अशी ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी दिली.
अंबाजोगाई शहराच्या नगराध्यक्ष पदी विजयी झाल्याबद्दल लिंगायत व जंगम समाजाच्या वतीने नंदकिशोर मुंदडा यांचा नुकताच श्री.शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान येथे श्री शंभुलिंग शिवाचार्य महाराजांच्या हस्ते व समस्त वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला होता. याच कार्यक्रमात नगरसेवक संजय गंभीरे, गणेश देशमुख, संतोष काळे, शेख मुस्तकीम बागवान यांचा ही सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना नंदकिशोर मुंदडा बोलत होते.
यावेळी विस्ताराने बोलतांना नंदकिशोर मुंदडा पुढे म्हणाले की, अंबाजोगाई शहरात उत्तम प्रतीच्या नागरी सुविधा देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तसेच मठ संस्थान साठी तीर्थक्षेत्र विकास योजनेतून विविध विकास कामे केली जातील असे सांगून त्यांनी लिंगायत व जंगम समाजा चा सध्याचा ज्वलंत प्रश्न म्हणजे रुद्र भूमी स्मशानभूमी बाबत भाष्य केले, त्यांनी सांगितले की, शासनाने दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ व ७ एप्रिल २०२३ रोजी घेतलेले निर्णय व ७ एप्रिल २०२४ रोजी ची अधिसूचना करण्याबाबत लिंगायत समाजाने दिलेल्या निवेदनानुसार बाराखांबी (सकलेश्वर मंदिर) येथील शासनाने संपादित केलेल्या जमिनीवर व अंत्यविधी करून दफन केलेल्या ठिकाणी कसल्याही प्रकारचे उत्खनन करू नये याबाबत शासनास यापूर्वीच आ. नमिता मुंदडा यांनी लेखी पत्र देऊन कळवलले असल्याचे त्यांनी सांगितले.
या सत्कार कार्यक्रमात श्री. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करून आशीर्वाद दिले. या कार्यक्रमास विश्वस्त मंडळाचे सचिव विजयकुमार चलवदे, बाबासाहेब बुरांडे, दिलीप बुरांडे, गणेश टुरके, ऍड. संजय व्यवहारे, महेश उरगुंडे, परमेश्वर शेटे, शिवप्रसाद राऊत, कुलदीप वाघमारे ,अशोक खंदारे, सचिन तोडकर ,जगदीश ढेले चंद्रशेखर डीगे, विजयकुमार खंदारे ,नवनाथ पोखरकर, नरेश मेहत्रे, प्रशांत स्वामी, राहुल शेटे, गंगासागर बुरांडे, यांच्यासह अनेक समाज बांधव व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त नायब तहसीलदार शंकर बुरांडे यांनी केले.