Breaking

बीड-वडवणी रोडवर भीषण अपघात; दोन तरुणांचा मृत्यू

Updated: जानेवारी 29, 2026

By Vivek Sindhu

दिव्यांग व्यक्तीला फरशीने मारहाण; एकावर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: बीड-वडवणी रोडवर घोडका राजुरी शिवारात दोन दुचाकींच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना २८ जानेवारी रोजी घडली आहे.

मन्मथ मेवारे (वय ३१, रा. ढेकणमोहा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुचाकी क्रमांक MH 23 AM 9443 च्या चालकाने वेगात आणि हयगयीने वाहन चालवून फिर्यादीचा मेहुणा बसलेल्या दुचाकीला (क्रमांक MH 23 BP 2969) जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दीपक महाजन आणि अभिषेक होंडरे (दोन्ही रा. ढेकणमोहा) या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात अन्य दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पिंपळनेर पोलिसांनी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार वनवे तपास करत आहेत.


Categories

Recent Posts