Breaking
Updated: जानेवारी 31, 2026
नोकरीचे आमिष दाखवून शिक्षिकेचे लैंगिक शोषण; अंबाजोगाई तालुक्यातील घटना
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई तालुक्यातील घटना
अंबाजोगाई: तालुक्यातील धायगुडापिंपळा येथे एका २८ वर्षीय सहशिक्षिकेचे नोकरीचे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चौघांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडितेने ३० जानेवारी रोजी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, आरोपी मोहीन बासद शेख याने पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन हे कृत्य केले. १६ जानेवारी रोजी पीडितेच्या घरात शिरून आरोपीने तिला धमकी दिली होती. आरोपी मोहीन याला त्याचे भाऊ बाबा शेख, इरशाद शेख आणि मोसीन शेख यांनी देखील साथ दिली आणि पीडितेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी चौघांविरुद्ध बलात्कार आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधवर या प्रकरणाचा तपास करत आहेत.