Breaking

शिक्षक खमरोद्दीन फारुखी यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू

Updated: फेब्रुवारी 28, 2026

By Vivek Sindhu

शिक्षक खमरोद्दीन फारुखी यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज: येथील रहिवासी आणि नांदूर घाट येथील मूकबधिर विद्यालयातील शिक्षक खमरोद्दीन सदरोद्दीन फारुखी (३८) यांचा शुक्रवारी रात्री केज-बीड रस्त्यावरील बरड फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली जेव्हा फारुखी आपल्या दुचाकीवरून शाळेतून घराकडे परतत होते. बरड फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीची धडक एका ट्रॅक्टर ट्रॉलीशी झाली, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले, मात्र शनिवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अत्यंत सक्रिय आणि परिचित व्यक्तिमत्त्व असलेल्या खमरोद्दीन फारुखी यांच्या जाण्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे नांदूर घाट येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खमरोद्दीन फारुखी यांचा अंत्यविधी शनिवारी सायंकाळी चार वाजता केज येथील फारुखी कब्रस्तानमध्ये पार पडणार आहे. एका उमद्या शिक्षकाच्या अकाली निधनामुळे समाजमनातून तीव्र दुःख व्यक्त होत आहे.


Categories

Recent Posts