Breaking
Updated: ऑक्टोबर 11, 2025
केज येथील रास्ता रोको प्रकरणी बाळराजे आवारेसह ३३३ जणांविरुद्ध गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – शेतातील वाळलेली बाभळ उचलून बाजूला सारल्याच्या कारणावरून एका तरुणास काठी, फायटर, लोखंडी गज, क्लच वायर, विटाने मारहाण करीत हल्ला केल्याची घटना डिघोळअंबा (ता. अंबाजोगाई) येथे घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
डिघोळअंबा (ता. अंबाजोगाई) येथील पंडीत बालासाहेब सोनवणे (वय ३१) या तरुणाने ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास शेतात पडलेली वाळलेली बाभळ उचलून बाजूला सारल्यावरून त्यांचा शुभम विलास सोनवणे व त्याच्या मित्राने शिवीगाळ करीत खाली पाडून गळा दाबला. त्याच्या आईने सोडविल्याने ते निघून घेणे. त्यानंतर परत येताना दुपारी ४.३० वाजता शुभम व इतर सहा जण हे हातात काठी, फायटर, लोखंडी गज, क्लच वायर, वीट हातात घेऊन आले. गोविंद सोनवणे याने चापटाने व फायटरने दातावर मारल्याने दात निखळला. राहुल सोनवणे याने पाठीमागून डोक्यात काठी मारली. शुभम सोनवणे याने लोखंडी गजाने पाठीवर मारले. तर विलास सोनवणे याने क्लच वायरने पायावर, पाठीवर मारले. अनिता सोनवणे हिने वीट डोळ्यावर मारली. अरुण सोनवणे व एक अज्ञात इसमाने लाथाबुक्याने मारहाण करीत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन आल्यानंतर पंडित सोनवणे याने दिलेल्या तक्रारीवरून वरील लोकांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार भीमराव मांजरे हे करीत आहेत.