Breaking
Updated: नोव्हेंबर 26, 2025
टिप्परच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – कारला पिकअपने कट मारल्याने विचारणा करणाऱ्या तरुणास लाकडी दांड्याने डोक्यात मारून डोके फोडले. तर लाथाबुक्याने बेदम मारहाण केल्याची घटना केज शहरात घडली.
केज शहरातील वसुंधरा बँकेच्या बाजूस राहत असलेला तुषार सुरेश मेटे (वय २४) हा तरुण २५ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजता कारने बीडहुन केजकडे येत असताना शहरातील छत्रपती शिवाजी चौकात त्याच्या कारला पिकअप कट मारून पुढे बसस्थानकाजवळ जाऊन थांबले. त्याने पिकअप चालकाला जाऊन कट का मारला अशी विचारणा केली असता उमेर उर्फ पापा मुस्ताक फारोकी याने काही एक न विचारता हातातील लाकडी दांड्याने डोक्यात मारून डोके फोडले. त्याच्या सोबत असलेले अजीम मुस्ताक फारोकी, आयान हारुण बागवान व इतर दोन अनोळखी इसमांनी त्याला लाथाबुक्क्याने मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार तुषार मेटे याने दिल्यावरून उमेर उर्फ पापा फारोकी, अजीम फारोकी (दोघे रा. बस स्टँडच्या पाठीमागे, केज), आयान हारुण बागवान रा. केज व इतर दोन अनोळखीविरुद्ध केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार बालासाहेब रोडे हे करीत आहेत.