Breaking

तळेगावातील वेश्या व्यवसायावर धाड

Updated: ऑक्टोबर 31, 2025

By Vivek Sindhu

तळेगावातील वेश्या व्यवसायावर धाड

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

प्रतिबंध कक्षाने छापा टाकून दोन पीडित महिलांची केली सुटका

बीड – पोलीस ठाणे बीड ग्रामीण हद्दीत तळेगाव येथील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी PSI पल्लवी जाधव यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने सापळा रचला. डमी ग्राहकाला घटनास्थळी पाठवून पडताळणी केली असता, महिला एजंटने १,००० रुपये व्यवहारास मान्यता दिली. ठरलेल्या इशाऱ्यानंतर पथकाने छापा मारला.

कारवाईत महिला एजंट माया अरुण कांबळे (३८, रा. महाकुंडे वसती, तळेगाव) हिला ताब्यात घेतले. तिच्याकडून डमी ग्राहकाने दिलेल्या दोन ५०० रुपयांच्या नोटा पंचांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आल्या. रूममधून ३४ निरोधही मिळाले.

चौकशीत माया कांबळे आणि तिचा सहकारी सुरेश नवनाथ भोसले हे बाहेर जिल्ह्यातून महिलांना बोलावून पैसे घेऊन वेश्या व्यवसायास प्रवृत्त करत असल्याची माहिती समोर आली. दोघांवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५, ६ तसेच भादंवि कलम ३(५) प्रमाणे बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. दोन्ही पीडित महिलांची सुरक्षित सुटका करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावट, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि उमाशंकर कस्तुरे, PSI पल्लवी जाधव, महिला पोलीस उषा चौरे, शोभा जाधव, हवालदार प्रदीप येवले, अशोक शिंदे व कर्मचारी गजानन चौधरी, उर्मिला म्हस्के (AHTU टीम) यांनी संयुक्तपणे केली.


Categories

Recent Posts