Breaking

आंतरराष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेसाठी डॉ.संतोष कदम यांची निवड

Updated: ऑक्टोबर 4, 2025

By Vivek Sindhu

दुबईत होणाऱ्या ४५ वर्षांवरील व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

दुबईत होणाऱ्या ४५ वर्षांवरील व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात

दुबई मुहसिंहा येथील इनडोअर स्टेडियम मध्ये १८ ते २३ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी अंबाजोगाई येथील योगेश्वरी क्रीडा मंडळाचे खेळाडू डॉ.संतोष कदम यांची भारतीय संघात निवड झाली आहे.

दुबई येथे होणाऱ्या या मास्टर्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतासह स्पेन,पोलंड, युयेई, पाकिस्तान, फिलिपाईन्स, नेपाळ व युरोपियन युनियन संघाचा समावेश असणार आहे.पुणे येथे झालेल्या मास्टर्स व्हॉलीबॉल स्पर्धेतून संतोष कदम यांची निवड झाली आहे.या संघात महाराष्ट्रासह केरळ,कर्नाटक,दिल्लीच्या खेळाडूंचा समावेश आहे.यापूर्वी त्यांनी अनेकवेळा राष्ट्रीय व राज्य स्पर्धेत चमकदार कामगिरी केली असून राज्य व विद्यापीठ संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. अश्वमेध क्रीडा स्पर्धेतील पहिले उत्कृष्ट खेळाडू आहेत. महाराष्ट्र संघाचे व विद्यापीठाचे प्रशिक्षक व निवड समिती सदस्य म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या निवडीचे कौतुक योगेश्वरी क्रीडा मंडळाचे सर्व सभासद यांच्यासह व्हॉलीबॉल खेळाडूंनी केले आहे.


Categories

Recent Posts