Breaking

‘महाट्रान्सको’च्या सीएसआर निधीतून स्वाराती रुग्णालयासाठी आधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका मंजूर

Updated: ऑक्टोबर 14, 2025

By Vivek Sindhu

आ. नमिता मुंदडा यांनी केले होते प्रयत्न

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आ. नमिता मुंदडांच्या विनंतीला मिळाला सकारात्मक प्रतिसाद

अंबाजोगाई : अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (स्वाराती रुग्णालय) अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका मिळणार आहे. महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (CSR) या रुग्णवाहिकेसाठी तब्बल १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निर्णय आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या विनंतीनंतर घेण्यात आला.

गोरगरीब रुग्णांची जीवनवाहिनी असणाऱ्या स्वाराती रुग्णालयासाठी कार्डियक रुग्णवाहिकेची नितांत गरज होती. अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात पोहोचण्यापर्यंतच्या अत्यंत महत्वाच्या क्षणांमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू करता यावेत यासाठी आ. मुंदडा या रुग्णवाहिकेसाठी प्रयत्नशील होत्या. त्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत १३ ऑक्टोबर २०२५ रोजी महाट्रान्सकोच्या लेबर, इंडस्ट्रियल रिलेशन्स आणि एम्प्लॉई वेलफेअर विभागाने हा निर्णय घेतला आहे. स्वाराती रुग्णालयात हृदयविकाराने त्रस्त रुग्णांना तातडीने उपचारासाठी सहाय्य मिळावे हा त्याचा उद्देश आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य अभियंत्यांना या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी दिली आहे. सदरील रुग्णवाहिकेची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी रुग्णालयावर राहणार आहे.

या निर्णयामुळे बीड जिल्हा आणि अंबाजोगाई परिसरातील हृदयविकाराच्या रुग्णांना तातडीच्या उपचारासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण आरोग्य सेवेसाठी आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.


Categories

Recent Posts