Breaking

स्वामी रामानंद तीर्थ यांचे शिक्षण विषयक विचार आजच्या काळातही दिशादर्शक

Updated: ऑक्टोबर 6, 2025

By Vivek Sindhu

अर्थतज्ञ डॉ.विकास सुकाळे यांचे प्रतिपादन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अर्थतज्ञ डॉ.विकास सुकाळे यांचे प्रतिपादन

अंबाजोगाई : येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेत हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रणेते थोर स्वातंत्र्य सेनानी, शिक्षणतज्ञ तथा समाज सुधारक पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांची 122 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी संस्था परिसरात असलेल्या पूज्य स्वामी रामानंद तीर्थ व थोर स्वातंत्र्य सेनानी पूज्य बाबासाहेब परांजपे यांच्या पुतळ्यांना प्रमुख व्याख्याते नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख तथा माजी अधिष्ठाता प्रा.डॉ.विकास सुकाळे व योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने नागापूरकर सभागृहात संगीत शिक्षक श्री विश्वजीत घाट,श्री अशोक खंदारे, श्रीरंग सुरवसे यांनी भजन सादर केली. पूज्य स्वामीजींच्या जयंतीच्या निमित्ताने संस्थेने आयोजित केलेल्या पोवाडा स्पर्धा टेबल टेनिस स्पर्धा व अन्य स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या संघांना विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने डॉ.विकास सुकाळे यांचे “युगपुरुष स्वामी रामानंद तीर्थ यांचे शैक्षणिक विचार व कार्य ” या विषयावर व्याख्यान झाले.आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी स्वामीजींच्या कार्याचा आढावा घेत त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची सविस्तर माहिती देऊन आजच्या परिस्थितीतही स्वामीजींचे शिक्षण विषयक विचार राष्ट्राला दिशा देणारे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ सल्लागार तथा योगेश्वरी महाविद्यालयाचे प्रभारी प्रा.एन.के.गोळेगावकर हे होते त्यांनी अध्यक्षीय समारोपात संस्था आजही स्वामीजींच्या विचारावर चालते असे स्पष्ट करून स्वामीजींनी दिलेले संस्कार आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आर. व्ही.कुलकर्णी यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही.कानेटकर यांनी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांचे स्वागत केले तर व्याख्याते डॉ.विकास सुकाळे यांचा सत्कार प्रा.एन.के.गोळेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. व्याख्यात्यांचा परिचय संगणक विभाग प्रमुख डॉ. राजेश्वर जोशी यांनी करून दिला तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. सुशील कुलकर्णी यांनी केले.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री.जी.बी.व्यास गुरुजी, संस्थेचे कार्यकारी उपाध्यक्ष जगदीश चौसाळकर, सचिव कमलाकरराव चौसाळकर , कोषाध्यक्ष डॉ शैलेश वैद्य, संस्थेचे सहसचिव भीमाशंकर शेटे, ज्येष्ठ सल्लागार माणिकराव लोमटे, योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनीचे मार्गदर्शक रमन सोनवळकर, संचालक श्री. पाशुमियां , अंगदराव कऱ्हाड, ॲड कल्यानी विर्धे यांचेसह प्रा.साहेबराव गाठाळ, प्रा.नानासाहेब गाठाळ, श्री.उदय असरडोहकर,स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत देशमुख, कॅप्टन एस. पी. कुलकर्णी, डॉ. गणेश पिंगळे, चौसाळकर तंत्रनिकेतन चे प्राचार्य रमन देशपांडे यांच्यासह संस्थेच्या विविध विभागातील प्रमुख प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Categories

Recent Posts