Breaking
WhatsApp Group
Join Nowसंतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद; 7 जुलैला सुनावणी
बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले हा केवळ गँग लीडर होता. वाल्मीक कराड हाच त्यांचा पडद्यामागे असणारा खरा सूत्रधार होता, असा दावा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मंगळवारी कोर्टात युक्तिवाद करताना केला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात जवळपास 3 तास सुनावणी झाली. त्यात वाल्मीक कराडच्या वकिलांनी 2 तास युक्तिवाद केला. तर उज्ज्वल निकम यानी 1 तास युक्तिवाद केला. यावेळी केवळ वाल्मीक कराडच्या दोषमुक्तीवर युक्तिवाद झाल्याची माहिती आहे. उज्ज्वल निकम सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, वाल्मीक कराडने कोर्टात आपला देशमुख यांच्या हत्येच्या कटात कोणताही सहभाग नसल्याचा दावा केला.
तसेच आपल्यावर करण्यात आलेली मकोकाची कारवाईही चुकीची असल्याचाही युक्तिवाद केला. पण आम्ही त्यावर जोरदार आक्षेप घेतला. आम्ही कोर्टापुढे त्याच्याविरोधात असणारे पुरावे सादर केले. कटाचा मुख्य सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो. तो आपल्या कठपुतळ्यांच्या माध्यमातून वाईट कृत्य करतो हे कोर्टाला पटवून दिले. त्यानंतर कोर्टाने 7 जुलैपर्यंत आपला निकाल राखून ठेवला.
वाल्मीक कराडचे वकील आच्या सुनावणीत युक्तिवाद करताना म्हणाले की, प्रस्तुत प्रकरणात 3 वेगवेगळे गुन्हे आहेत. प्रत्येक एफआयआरचे वेगवेगळे आरोपपत्र दाखल झाले पाहिजे. वाल्मीक कराडचा मकोकाशी कोणताही संबंध नाही.
त्यांचा गुन्हा व एफआयआर वेगळा आहे. 6 डिसेंबर रोजी वॉचमन सोनवणे यांना मारहाण झाली. या घटनेचा खंडणीशी कोणताही संबंध नाही. या प्रकरणात शिवराज देशमुख हा मुख्य फिर्यादी आहे. त्याच्या जबाबात वाल्मीक कराडचे कुठेही नाव नाही. 15 जानेवारी 2025 रोजी वाल्मीक कराडला हत्या प्रकरणात आरोपी करण्यात आले.
प्रस्तुत प्रकरणात अण्णा म्हणजे वाल्मीक कराड हाच असे नाही. संतोष देशमुख यांनाही अण्णा म्हणूनच बोलावले जात होते. पण वाल्मीकलाच अण्णा म्हणून आरोपी करण्यात आले. सीआयडीने मांडलेले मत हे त्यांचे आहे. या प्रकरणी पोलिस तपास गरजेचा होता, असे ते म्हणाले.
उज्ज्वल निकम यांनी वाल्मीक कराडच्या वकिलाचा युक्तिवाद जोरकसपणे फेटाळून लावला. ते म्हणाले. या प्रकरणी संपूर्ण केसचा हेलिकॉप व्ह्यू घ्यावा लागले. आरोपींनी आवादा कंपनीला 2 कोटी मागितले. या संपूर्ण प्रकरणात वाल्मीक कराड हा पडद्यामागे असणारा दिग्दर्शक होता. संतोष देशमुख यांनी आपल्या निकटवर्तीयांना ही गोष्ट सांगितली होती. त्याचे डिजिटल पुरावे पुरेसे आहेत. या घटनेनंतर वाल्मीक कराड व विष्णू चाटे अस्वस्थ झाले. त्यांनी नुसती मारामारी काय करता? असा अप्रत्यक्ष संदेश सुदर्शन घुले व इतरांना दिला.
प्रस्तुत प्रकरणात सुदर्शन घुले हा गँग लीडर आहे. पण पडद्यामागे वाल्मीक कराड ह खरा सूत्रधार आहे. या प्रकरणात तपास पोलिसांनी नाही तर सीआयडीच्या तज्ज्ञ टीमने केला आहे, असे ते म्हणाले.
Last Updated: June 25, 2025