Breaking

फोटोशेशन थांबवा, शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या

Updated: सप्टेंबर 24, 2025

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2025 09 24 at 16.06.12 500260f3

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांची मागणी

अंबाजोगाई : परतीच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरीपाचे पिक वाहून गेले असून अनेक ठिकाणी शेतीची जमीन खरडून गेली आहे. मात्र या संकटात सरकारकडून तातडीची मदत न देता मंत्री-आमदारांचे फक्त फोटोशेशन सुरू आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी तहसीलदार विलास तरंगे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या मदतीची मागणी केली.

देशमुख यांनी सांगितले की, राज्य सरकारने फक्त ढगफुटीग्रस्त मंडळांमध्ये मदत जाहीर केली आहे. पण प्रत्यक्षात प्रत्येक तालुक्यात ढगफुटी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्याने त्या पुन्हा कसण्यासाठी किमान 50 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने देण्यात यावी.

निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागणीत अंबाजोगाई तालुक्याला ओला दुष्काळ घोषित करणे, खरडलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर 20 लाख रुपयांची मदत देणे, शेतकऱ्यांचे सर्व कृषी कर्ज व इतर कर्ज सरसकट माफ करणे, सर्वांना विमा मंजूर करणे, तसेच पुरामुळे वाहून गेलेल्या जनावरांच्या पंचनाम्याची अट शिथिल करून तातडीची मदत देणे यांचा समावेश आहे.

या निवेदनावर अमर देशमुख यांच्यासह अ‍ॅड. ईस्माईल गवळी, अंकुश ढोबळे, संजय काळे, बालासाहेब कदम, रविंद्र मोरे, हमीद चौधरी, शेख इरफान, गणेश घाडगे, मारुती घाडगे, बाबुराव घाडगे, शेख आय्युब शेख मुस्ताक, तानबा लांडगे, भगवान ढगे, सुधाकर जोगदंड, व्यंकट मुंडे, करण देशमुख, पवन देशमुख, राहुल सिरसट, हाजी बागवान, पवन किर्दंत, यशोधन लोमटे, रमेश आडे, अनिकेत सोमवंशी, अमोल देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तातडीची मदत न मिळाल्यास पांढऱ्या कपड्यातील पुढाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशाराही देशमुख यांनी दिला.


Categories

Recent Posts