Breaking
Updated: ऑक्टोबर 16, 2025
कोल्हेवाडीत भांडण ; आठ जणांवर गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उंदरी (ता. केज) येथे छापा मारून ७४ हजार ८०२ रुपयांचा गुटखा व सहा लाख रुपयांची जीप जप्त केली. याप्रकरणी एकाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास उंदरी (ता. केज) येथील शुभम नरसिंग ठोंबरे याने त्याच्या राहत्या घरामध्ये व जीपमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळल्यावरून १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.२० वाजता अचानक पथकाने छापा मारला. पोलिसांना पाहून शुभम ठोंबरे हा पळून गेला. त्याचा पाठलाग करून ही पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांनी घराची व जीपची (एम. एच. १६ बीझेड ७०५४) झडती घेतली असता त्यामध्ये ७४ हजार ८०२ रुपयांचा विविध प्रकारच्या गुटखा व सुगंधी तंबाखू मिळून आल्याने पोलिसांनी गुटख्यासह सहा लाख रुपयांची जीप जप्त केली. स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार महेश विघ्ने यांच्या तक्रारीवरून शुभम ठोंबरेविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.