Breaking
Updated: जानेवारी 30, 2026
एसटी चालकाला मारहाण; बसची तोडफोड करून सरकारी कामात अडथळा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelनेकनूर: लोणी फाटा परिसरात एसटी बस आडवी लावून चालकाला खाली ओढत मारहाण केल्याची आणि बसची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भास्कर उत्तमराव बांगर (वय ४४, रा. वाधीरा, ता. पाटोदा) हे पाटोदा आगाराचे एसटी बस चालक आहेत. २७ जानेवारी रोजी ते आपली बस घेऊन पाटोदा येथून चौसाळाकडे जात असताना लोणी फाट्यापुढे आरोपी प्रकाश ऊर्फ पापा लाला पवार आणि त्याच्या दोन भावांनी आपली गाडी बससमोर आडवी लावली. आरोपींनी फिर्यादीला बसच्या खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच बसची मागील काच फोडून नुकसान केले.
नेकनूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार परजणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.