Breaking

श्री योगेश्वरी मल्टिस्टेटच्या सभासदांना भेटवस्तूच्या रुपात लाभांश वाटप

Updated: सप्टेंबर 11, 2025

By Vivek Sindhu

श्री योगेश्वरी मल्टिस्टेटच्या सभासदांना भेटवस्तूच्या रुपात लाभांश वाटप

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई (प्रतिनिधी):-अंबाजोगाई शहरातील श्री योगेश्वरी मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि. च्या सभासदांना भेटवस्तु (ट्रॉलीबॅग) वाटपाची सुरुवात करण्यात आली. मंगळवार दि ९ रोजी प्रायोगिक तत्त्वावर काहीजणांना या भेटवस्तूचे वाटप देखील करण्यात आले. या लाभांश वाटप कार्यक्रम प्रसंगी श्री योगेश्वरी मल्टिस्टेटचे संस्थापक राजकिशोर मोदी, अध्यक्ष रिकबचंद सोळंकी, संचालक सुधाकर टेकाळे, ऍड अनिल लोमटे, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष ढगे यांच्या उपस्थितमध्ये दगडू आरसुळ, विठ्ठल काळे, वैभव बजाज ,श्याम अपूर्वा , बुरांडे दिलीप, सावरे संतोष, जयश्री टेकाळे व रेश्मा टेकाळे यांना भेटवस्तू (ट्रॉलीबॅग) चे वाटप करण्यात आले.
अकरा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली श्री योगेश्वरी मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि,.ही ग्राहकांना विविध प्रकारे सेवा पुरवत आहे. अंबाजोगाई शहर व परिसरातील आर्थिक चक्र गतिमान करण्यासाठीचा प्रयत्न मल्टिस्टेटच्या माध्यमातून करून त्याचबरोबर शहरातील सुशिक्षित बेरोजगाराना व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळोवेळी त्यांना मदतीचा हात देऊन श्री योगेश्वरी मल्टिस्टेट आपले सामाजिक दायित्व सांभाळत आहे. अंबाजोगाई आणी बसवकसल्याण येथे कार्यरत असलेल्या श्री योगेश्वरी मल्टिस्टेट ची सभासद संख्या ही १७२८ एवढी असून ठेवी या २६.३३ कोटी असून कर्जवाटप हे रु १८ कोटीचे करण्यात आली आहे. तर १४ कोटींची गुंतवणूक ही श्री योगेश्वरी मल्टिस्टेटने केली आहे. संस्थेकडून सोनेतारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, तसेच अन्य कर्जाच्या स्वरूपात ही संस्था ग्राहकांचे हित जोपासण्याचे काम करत आहे. यामुळे मार्च २०२५ अखेर श्री योगेश्वरी मल्टिस्टेट या संस्थेस ६५ लाखांचा नफा झाला होता.
मागील वर्षी देखील श्री योगेश्वरी मल्टिस्टेट कडून अशाच स्वरूपात भेटवस्तू देऊन सभासदांना लाभांश वाटप केला होता. मिळालेली गृहोपयोगी भेटवस्तू घेऊन सभासद समाधान व्यक्त करत आहेत. राजकिशोर मोदी यांच्या संकल्पनेतुन सुरू झालेली ही संस्था अध्यक्ष रिकबचंद सोळंकी यांच्या माध्यमातून अतिशय उत्तम प्रकारे वाटचाल करत आहे. सोळंकी यांना उपाध्यक्ष शेख अन्वर हुसेन शेख वली हसन संचालक विलास जाधव, भागवत मसने, कांतीलाल शर्मा, आप्पासाहेब संकाये, सुधाकर टेकाळे, ऍड विलास लोखंडे, ऍड अनिल लोमटे, शेख मुक्तार फकीर अहमद,सचिन बजाज, श्रीमती आशालता वांजरखेडकर, मंदाकिनी खडके हे सहकार्य करत आहेत.


Categories

Recent Posts