Breaking

डिजिटल शेती शाळेतून नैसर्गिक निविष्ठा निर्मितीचे मार्गदर्शन

Updated: एप्रिल 10, 2026

By Vivek Sindhu

डिजिटल शेती शाळेतून नैसर्गिक निविष्ठा निर्मितीचे मार्गदर्शन.

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

धानोरा खुर्द येथील शेतकऱ्यांचा शेतीशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आंबेजोगाई : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर व कमी खर्चात निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दिनांक ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता डिजिटल शेती शाळेचे आयोजन करण्यात आले. ‘जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

सदर उपक्रम नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. यामध्ये शेतकऱ्यांना जीवामृत, घन जीवामृत, दशपर्णी अर्क, नीम अर्क आदी नैसर्गिक निविष्ठा घरच्या घरी तयार करण्याच्या पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून खर्चात बचत व उत्पादनवाढीचे महत्त्वही स्पष्ट करण्यात आले.

या डिजिटल शेती शाळेला आंबेजोगाई उपविभागातील सुमारे १७० गावांमधील शेतकऱ्यांनी युट्युबद्वारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. धानोरा खुर्द येथे तालुका कृषी अधिकारी विजयकुमार पवार यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी पंडित काकडे उपस्थित होते. तसेच गावातील ग्रामविकास समितीचे सर्व सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ. पार्वती पोळ व उपसरपंच बालासाहेब गुणाले यांनीही उपस्थिती दर्शवली.

हा उपक्रम उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला असून, तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी नोंदणी व कार्यक्रमाच्या ऑनलाईन लिंकसाठी समन्वय साधला. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतावरच नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याचे कौशल्य मिळून खरीप हंगामासाठी अधिक सक्षम तयारी करता येणार आहे.


Categories

Recent Posts