नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, एकूण १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.