Breaking
Updated: ऑक्टोबर 17, 2025
सोनसाखळी चोरणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे शाखेची अटक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : सावरगाव येथील दसरा मेळाव्यात गर्दीचा फायदा घेत नागरिकाची सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या एका दिवसात अटक केली आहे. त्याच्याकडून दोन तोळे सोनसाखळी जप्त करण्यात आली आहे.
अंमळनेर पोलिस ठाण्यात फिर्यादी लहु काशीनाथ नागरगोजे (रा. रोहतवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सावरगाव दसरा मेळाव्यात गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी केली होती. याप्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 196/2025 भादंवि कलम 303(2) अंतर्गत नोंद करण्यात आली होती.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान बीड स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, आरोपी आकाश सोपान ससाणे (रा. राजुरी, ता. जि. बीड) हा चोरी केलेली सोनसाखळी विक्रीसाठी थांबलेला आहे. तत्काळ पथकाने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून दोन तोळ्यांची सोनसाखळी हस्तगत करण्यात आली. त्याला पुढील कार्यवाहीसाठी अंमळनेर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
तपासात आरोपीकडून अशा स्वरूपाचे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, सहायक पोलीस निरीक्षक धनराज जारवाल, पोलीस हवालदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, आनंद मस्के, बाळू सानप, पोलीस कॉन्स्टेबल यादव व सिद्धेश्वर मांजरे यांच्या पथकाने केली.