Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

शिरापुरात घरफोडी; ३ लाख ४ हजारांचा ऐवज चोरीला

Updated: ऑक्टोबर 31, 2025

By Vivek Sindhu

शिरापुरात घरफोडी; ३ लाख ४ हजारांचा ऐवज चोरीला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाटोदा (प्रतिनिधी) – शिरूर कासार तालुक्यातील शिरापुर (धुमाळ) येथे घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ३ लाख ४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी बाळासाहेब लक्ष्मण बहिर (वय ४२, व्यवसाय शेती, रा. शिरापुर धुमाळ, ता. शिरूर कासार, जि. बीड) यांनी पाटोदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ही घटना दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान घडली. फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय कापूस वेचण्यासाठी शेतात गेले असताना त्यांनी गडबडीत घराला कुलूप लावणे विसरले. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ३,०४,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

चोरट्यांनी घेतलेल्या ऐवजामध्ये ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण (किंमत १,८६,००० रुपये), ६ ग्रॅम सोन्याचे डांबर (किंमत ३७,००० रुपये), ५ ग्रॅम सोन्याचे वेल (किंमत ३१,००० रुपये) तसेच ५०,००० रुपयांची रोकड असा मुद्देमाल आहे.

या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सपोनि तागड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.


Categories

Recent Posts