Breaking
Updated: सप्टेंबर 8, 2025
सालगडी शेतमालकाच्या घरातून ४० हजार रुपये घेऊन फरार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपाटोदा : तालुक्यातील पिंपळवंडी शिवारात रविवारी शेतातील वादातून दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीची घटना घडली. या मारहाणीमध्ये दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी फिर्यादी देत गुन्हे दाखल झाले असून दोन्ही गटांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गणेश लक्ष्मण पवार (वय २३, व्यवसाय हॉटेल चालक व शेती, रा. गोरसाळ वस्ती, पिंपळवंडी, ता. पाटोदा) यांच्या फिर्यादीनुसार, ७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता गोरसाळ वस्ती शिवारात दत्तात्रय दादासाहेब पवार व मुरलीधर पवार (रा. सरदवाडी) यांच्यासोबत शेतातील वाद झाला. यावेळी दत्तात्रय पवार याने हातातील लोखंडी रॉडने गणेश पवार यांच्या डोक्यात मारहाण करून जखमी केले. त्यानंतर शिवीगाळ करत जीव मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
याउलट, दत्तात्रय दादासाहेब पवार (वय ३३, व्यवसाय शेती, रा. सरदवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की, त्याच दिवशी रात्री १०.११ वाजता कुंदेपटी शिवारात ते शेतात उडीद काढणीचे काम करीत असताना रोहित बबन पवार, चंद्रकांत एकनाथ पवार, अलका लक्ष्मण पवार, गणेश लक्ष्मण पवार व लक्ष्मण कचरु पवार (सर्व रा. पिंपळवंडी) यांनी एकत्रित हल्ला केला. आरोपी गणेश पवार याने हातातील लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात प्रहार केला, तर इतरांनी मिळून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच दुचाकी (क्र. MH23P5497) तोडफोड करून नुकसान केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन्ही परस्परविरोधी गुन्ह्यांचा तपास अमळनेर पोलीस ठाण्याचे पोह माळी करत आहेत.