Breaking

शेकाप, संघर्ष समितीचा तहसिलवर मोर्चा धडकला

Updated: सप्टेंबर 25, 2025

By Vivek Sindhu

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

केज – केज तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, पावसाने व नदीच्या पुराने पशुधन मरण पावलेल्या शेतकऱ्यांना विशेष भरपाई देऊन पशुधन खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, कर्जमाफी करावी यासह इतर मागण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्ष व केज विकास संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

शेकापचे नेते भाई मोहन गुंड व केज विकास संघर्ष समितीचे समन्वयक हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून थेट तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी वरील मागण्यांसह अतिवृष्टीत मयत झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी २० लाखाची मदत द्यावी, पिक विमा कंपनीने रद्द केलेला ट्रेगर पुन्हा लागु करावा, तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीचा विमा वाटप करावा, खरीप २०२५ चा पिक विमा भरलेल्या त्या शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान गृहीत पिक विमा लागू करावा. या मागण्यांचे निवेदन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी स्वीकारले. आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.

स्थलांतरित कुटुंबांना मदत, सरसगट पंचनामे सुरू – तहसीलदार राकेश गिड्डे

मांजरा नदी काठी असलेल्या इस्थळ गावातील ६० कुटुंबे, पिठ्ठीघाट येथील तांबडे वस्तीवरील १३ कुटुंबे, बोरगाव (बु.) येथील काही कुटुंबासह स्थलांतरित केलेल्या कुटुंबांना प्रत्येकी १० किलो गहू व १० किलो तांदूळ वाटप केला असून या कुटुंबास प्रत्येकी ५ हजार रुपये मदत केली जाणार आहे. पशुधन मरण पावलेल्या शेतकऱ्यांपैकी तेलेवस्तीवरील शेतकऱ्यास मदत केली असून उर्वरित शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. सरसगट पंचनामे सुरू असून नदी, नाल्याच्या वाहून गेलेल्या ठिबक, सोलरसह विहिरीतील मोटार पंचनामे केले जाणार आहेत. अशी माहिती तहसीलदार राकेश गिड्डे यांनी देऊन कुठे काही प्रकार घडल्यास नागरिकांनी निदर्शनास आणून द्यावा, असे आवाहन केले.


Categories

Recent Posts