Breaking
Updated: जानेवारी 19, 2026
श्री. ४२० सौरभ कुलकर्णी प्रकरण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगौतम बचुटे/केज :- वैद्यकीय शिक्षणासाठी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह अनेक राज्यातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची फसवणूक करून त्यांच्याकडून कडून लाखो रु. उकळणाऱ्या महाठक श्री .४२० सौरभ कुलकर्णी याला दि. १३ जानेवारी २०२६ रोजी बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील डॉ. तोंडे यांची फसवून करून आठ लाख रु. उकळल्या प्रकरणी केज उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक सय्यद जावेद कराडकर, पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार आणि अनिल मंदे यांनी कराड येथून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
त्या श्री. ४२० सौरभ कुलकर्णी यांचे अनेक कारनामे उघड होत आहेत. आता या नागपूर येथील महाठकाने नागपूर येथील बांधकाम व्यावसायिक सतीश गुरुमुखदास लालवाणी यांची एम.बी बी एस झालेली मुलगी डॉ. दिव्या सतीश लालवाणी हिला बेंगलोर किंवा कर्नाटक येथील वैद्यकीय कॉलेज मध्ये रद्द झालेल्या जागेवर त्वचा रोग शास्त्राच्या एम डी या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन मिळवून देतो म्हणून दि. २८ ऑक्टोबर २०२३ ते १४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ७० लाख रु. उकळले. मात्र त्या नंतर डॉ. दिव्या लालवाणी हिला तिचे नाव मॅनेजमेंट कोट्यातील संभाव्य प्रवेश यादीत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्या नंतर डॉ. दिव्या हिचे वडील आणि नागपूर येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सतीश लालवाणी यांनी त्याला पैसे परत मागितले परंतु त्यांनी पैसे परत दिले नाहीत आणि पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. म्हणून डॉ. दिव्या लालवानी यांचे वडील सतीश लालवाणी यांनी दि. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी नागपूर शहरातील जरीपटका पोलिस ठाण्यात सौरभ कुलकर्णी आणि त्याचे साथीदार यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर परीक्षेसाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७० लाख रु. ची फसवणूक केल्याच्या तक्रार दाखल केली. त्या तक्रारी नुसार सौरभ कुलकर्णी वय (३८ वर्ष) आणि त्याचे बेंगलोर येथील साथीदार के कृष्णमूर्ती वय (५० वर्ष), अनिस नुन्ना वय (३६ वर्ष) आणि जुनेद वय (४५ वर्ष) या चौघा ठका विरुद्ध नागपूर शहरातील जरीपटका पोलिस ठाण्यात गु. र. नं. ७७१/२०२४ भा. दं. वि. ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
त्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक संजय उदगीरकर हे करीत आहेत.