Breaking

जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेच्या कामात अडथळा ;  सरपंचाची तहसीलदारांकडे तक्रार 

Updated: फेब्रुवारी 27, 2026

By Vivek Sindhu

सरपंचाची तहसीलदारांकडे तक्रार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज  – काळेगावघाट (ता. केज) येथे जलजीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर असून जाधवजवळा येथील तलावाजवळ विहीर आणि पाईपलाईनच्या कामात खोडा घालून काही लोकांनी काम अडविले आहे. त्यामुळे हे अर्धवट काम पूर्ण करून घेण्यासाठी संबंधित लोकांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी सरपंच अविनाश गाताडे यांनी तहसीलदारांकडे केली आहे. 

      केज तालुक्यातील काळेगावघाट येथे जलजीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर आहे. या योजने अंतर्गत काळेगावघाट येथे पाण्याच्या टाकीचे आणि पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. तर जाधवजवळा येथील तलावाजवळ विहीर खोदून तिचे बांधकाम करून पाइपलाईनद्वारे काळेगावघाट येथे पाणी आणण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार विहीर आणि पाइपलाईनच्या कामात काही लोकांनी अडथळा निर्माण करून काम अडविले आहे. त्यामुळे विहीर आणि पाइपलाईनचे अर्धवट राहिले आहे. येणाऱ्या टंचाईच्या काळात गावकाऱ्यांवर पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येऊ नये, यासाठी हे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. शिवाय हे काम पूर्णत्वास नेल्याने शासनाचे उद्दिष्ट्ये सध्या होईल, गावातील लोकांची पाण्याची समस्या सुटेल. त्यासाठी काम आडविणाऱ्या व कामात अडथळा आणणाऱ्या लोकांना समज देऊन योग्य ती कारवाई करावी. ही पाणी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी मदत करावी, अशी मागणी काळेगावघाटचे सरपंच अविनाश गाताडे यांनी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


Categories

Recent Posts