Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

नायगाव घाटात कार-बस भीषण धडक; सरपंच पुत्राचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Updated: सप्टेंबर 24, 2025

By Vivek Sindhu

IMG 20250924 WA0015

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाटोदा : तालुक्यातील नायगाव घाटातील वळणावर मंगळवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास आरएमपीएम बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात थेरला (ता. पाटोदा) येथील सरपंचांचा मुलगा मोनू चंद्रकांत राख (वय २६) याचा जागीच मृत्यू झाला. तर विजय सानप (२९) आणि संघर्ष बांगर (२६) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

धडकेची भीषणता इतकी होती की कारचा चक्काचूर झाला, तर बस रस्त्याखाली जाऊन थांबली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमी विजय सानप आणि संघर्ष बांगर या दोघांना तातडीने बीड शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Categories

Recent Posts