Breaking
Updated: सप्टेंबर 29, 2025
सारणी येथील अतिवृष्टी नुकसानाची प्रशासनाकडून पहाणी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज- केज तालुक्यातील सारणी (सांगवी) येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी तालुका प्रशासनाच्या वतीने सारणी सज्जाचे तलाठी शेख यांच्याकडून करण्यात आली. यावेळी त्यांनी शेती तसेच घराची पडझड याची पाहणी केली.
गेल्या पंधरा दिवसापासून मराठवाड्यात अतिवृष्टीने थैमान घातले असून अनेक शेतकऱ्यांची जनावरे, गोठे तसेच नागरिकही वाहून गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांची आयुष्याची पुंजी या अतिवृष्टीच्या पाण्याबरोबर वाहून गेली आहे. त्यामुळे सरकार खडबडून जागे झाले असून मुख्यमंत्र्यांसह मंत्री तसेच तालुका प्रशासनातील कर्मचारी आता शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी झाले असून हे नुकसान सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तालुका प्रशासनातील कर्मचारीही शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच घरोघरी भेट देत आहेत. दि 27 सप्टेंबर रोजी सारणी सज्जाचे तलाठी शेख यांनीही शेतातील नुकसानग्रस्त ठिकाणी जाऊन येथील शेतकऱ्यांची विचारपूस करत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पडझाड झालेल्या घरांची पाहणी त्यांनी केली. या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीत पासून वंचित होऊ देणार नसल्याचे त्यांनी यावेळी ग्रामस्थांना सांगितले. यावेळी सरपंच राहुल ओव्हाळ तसेच इतर ग्रामस्थ त्यांच्यासोबत होते.