Breaking
Updated: ऑगस्ट 30, 2025
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वात्मक कल्याणाची संकल्पना मांडली- इंद्रजित देशमुख
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई(प्रतिनिधी) – पसायदान ही विश्व प्रार्थना असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी पसायदानाच्या माध्यमातून विश्वात्मक कल्याणाची संकल्पना मांडली त्यातूनच मैत्र भाव निर्माण झाला पाहीजे व पापाचा अंधार नाहीसा होऊन ज्ञानाचा उदय व्हावा हीच मागणी पसायदानातून माऊलींनी केली असल्याचे मत कऱ्हाड येथील प्रख्यात साहित्यिक इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.
येथील योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित योगेश्वरी क्रिडा प्रबोधिनी अंतर्गत यो.शि.संस्था कर्मचारी गणेश व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यो.शि. संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर होते.
ज्या व्यक्ती खल(वाईट प्रवृत्तीच्या) आहेत त्यांच्यातील खलत्व जावो (नष्ट होवो)अशा प्रकारे एक ना अनेक गोष्टी माऊलींनी भगवंताकडे प्रेम बुध्दीने मागितल्या. सर्व प्राणिमात्रांमध्ये स्नेहाची, प्रेमाची भावना निर्माण व्हावी त्यांच्या मनातील, शरीरातील दुष्ट भावनांचा नाश व्हावा त्याच प्रमाणे माणुसकी धर्म नसानसातून रुजावा स्वधर्म जोपासल्या जाव आणि अशा सकारात्मक गोष्टी घडून आल्यास सुर्यतेजाने विश्वातील प्रत्येकाचे जीवन उजळून निघेल व अखिल विश्वात शांती, ज्ञान,समृद्धी,समाधान व हृदय विशाल होईल असेही ते म्हणाले. प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत संस्थेच्या वतीने करण्यात आले.
पाहुण्यांचा परिचय शिवकन्या सांळुके यांनी करून दिला.कार्यक्रमाचे संचालन करून उपस्थितांचे आभार शिल्पा थोरात यांनी मानले.यावेळी प्रतिष्ठित नागरिक,संस्थेचे पदाधिकारी,संचालक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.