Breaking
Updated: सप्टेंबर 27, 2025
संघर्षभूमीवर दहावी संविधान सन्मान सभा उत्साहात संपन्न
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel अंबाजोगाई : २६ : भारतीय संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने प्रत्येक महिन्याच्या २६ तारखेला संघर्षभूमीवर संविधान सन्मान सभा घेण्यात येत आहे. यातील दहावी संविधान सन्मान सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन संघर्षभूमी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. जोरदार पाऊस सुरु असतानाही ही सन्मान सभा संपन्न झाली. सुरुवातीस संविधान उद्देशिका शिल्पास पुष्प अर्पण करण्यात आले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर उद्देशिकेचे सामुहीक वाचन करण्यात आले. या दहाव्या संविधान सन्मान सभेत संजय हतागळे यांचे ‘ संविधान – भारताचे लोक आणि ७५ वर्षाचे राजकारण ‘ या विषयावर व्याख्यान झाले.
अध्यक्षस्थानी ॲड शाम तांगडे होते.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना संजय हतागळे यांनी स्वातंत्र्य पूर्व काळातील विषम सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झालेली संविधान निर्मिती आणि संविधानाची १९५० ला अंमलबजावणी याचा थोडक्यात अढावा घेतला. संविधान निर्मितीची ही घटना एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. अशा परिस्थितीत ७५ वर्षाच्या राजकारणाचा त्यांनी थोडक्यात आढावा घेतला.
अध्यक्षीय समारोपात ॲड शाम तांगडे म्हणाले की , भारतात अनेक प्रकारची विषमता जातीयता होती. अज्ञानावर झालेली देशाची उभारणी बाजूला सारून स्वातंत्र्य , समता व बंधुता या तत्वावर एक नवीन राष्ट्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केले. ७५ वर्षाच्या राजकारणात प्रस्तापित पक्ष हे सतत निवडणूक यंत्रणांचा गैरवापर करून तसेच लोकांना फसवून सत्तेवर आले आहेत. ते प्रामाणिकपणे लोकनियुक्त झालेले नाहीत. असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा.डॉ.गणेश सुर्यवंशी यांनी केले. याप्रसंगी डॉ. किर्तीराज लोणारे , विश्वनाथ सावंत , मिलींद कांबळे , सुभाष घाडगे , बाबुभाऊ कांबळे , मुरलीधर कांबळे , वसंत वाघमारे आदींची उपस्थिती होती.